शहरातील कोविड सेंटरमध्ये महिला पोलीसांची नियुक्ती करा भाजपच्या महिला मोर्चा आघाडीची निवेदनाद्वारे मागणी
शहरातील कोविड सेंटरमध्ये महिला पोलीसांची नियुक्ती करा भाजपच्या महिला मोर्चा आघाडीची निवेदनाद्वारे मागणी : सीसीटीव्ही व रात्रगस्तही सुरू करा, दुर्लक्ष केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा कराड/प्रतिनिधी : राज्यातील अनेक कोविड सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या हे प्रकारे रोखण्यासाठी प्रत्येक कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. तसेच महिला रुग्णांच्या सुरक्षिततेकरिता त्याठिकाणी 24 तास महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून रात्रीच्या वेळेस महिला पोलीसांमार्फत गस्तही घालण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चा आघाडीतर्फे कराड शहराध्यक्ष सीमा घार्गे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन मंगळवारी 22 रोजी देण्यात आले. यावेळी महिला मोर्चाच्या अन्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या. भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा उषा खापरे यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भातील मागणीचे निवेदन दिले होते. त्यानुसार तालुका पातळीव