दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर 3/21/2020*(युवा निर्धार न्युज नेटवर्क)*
News Detail दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर 3/21/2020 *(युवा निर्धार न्युज नेटवर्क)* मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर होता, पण सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झालेली वाढ पाहता, सोमवारी होणारा पेपर आता थेट 31 मार्च नंतर होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसेच 31 मार्चनंतर या पेपरच्या परीक्षेची तारिख जाहीर करण्यात येणार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 मार्च रोजी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसंदर्भात मोठ्या निर्णयाची घोषणा केली होती. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची, तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होतील, अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र दहावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु आता राज्यातील परिस्थिती आणि