जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी

कराड, दि. 3 (प्रतिनिधी) ः कोरेगाव ता. कराड येथे शेतजमिनीच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव येथे दोन कुटुंबात शेतजमिनीचा वाद आहे. यामधील एका कुटुंबातील सदस्य त्या शेतात सिमेंटचे डांब रोवत होता. त्यावेळी दुसर्‍या कुटुंबातील व्यक्तीने सदरच्या शेतजमिनीत माझी वहिवाट आहे. तुम्ही कोर्टाचा कब्जा घेऊन या मगच पोल रोवा असे सांगितले. यावेळी दोन कुटुंबात बाचाबाची होऊन तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये लाकडी दांडके, लोखंडी गज व दगडाने मारहाण करण्यात आली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Post a Comment

0 Comments