अंग झडती घेतली अन तीन पिस्तूलधारी सापडले दीपावलीच्या पूर्वसंध्येला तीन पिस्तूलसह तिघे पोलिसांच्या जाळ्यात





अंग झडती घेतली अन तीन पिस्तूलधारी सापडले                       

दीपावलीच्या पूर्वसंध्येला तीन पिस्तूलसह तिघे पोलिसांच्या जाळ्यात

सातारा : कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शामगाव घाट ते कराड जाणाऱ्या रस्त्यावरील दर्शन रसंवतीगृहाचे समोर तीन देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे प्लॅस्टीकचे डबीसह, दोन मोबाईल व एक ब्रीझा कार असा सुमारे साडेआठ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये कराडातील एका बड्या दारु व्यवसायिकाच्या मुलाचा समावेश आहे.

कार्तीक अनिल चंदवानी (वय 19, रा. लाहोटीनगर, मलकापूर, ता. कराड), ऋतेष धर्मेंद्र माने (वय 22, रा. कृष्णा अंगण, बंगलो नं. सी-3, वाखाण रोड, कराड), अक्षय प्रकाश सहजराव (वय 28, रा. लाहोटीनगर, मलकापूर, ता. कराड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, करवडी गावचे हद्दीतील शामगाव घाट ते कराड शहर जाणारे रोडवरील दर्शन रसंवतीगृहाचे समोर कार्तीक चंदवानी, ऋतेष माने, अक्षय सहजराव हे तिघेजण ब्रीझा गाडीजवळ उभे होते. स्थानिक गुन्हे शाखेला याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी अकरा वाजण्याच्या सुमारास करवडीजवळ सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. तिघांची अंगझडती घेतली असता तिघांकडे तीन देशी बनावटीचे पिस्टल, तिन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व एक ब्रीझा कार असा सुमारे साडे आठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. संशयितांमध्ये कराडमधील एका बड्या दारू व्यवसायिकाच्या मुलाचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments