सामाजिक कार्यकर्ते सुदाम साळुंखे यांच्या मातोश्री सौ. सुनीता आत्माराम साळुंखे प्रभाग आठ मधून इच्छुक.!
कराड : बहूप्रतीक्षेत असलेल्या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे सध्या जोराने वाहू लागले आहे. यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. याच दरम्यान, प्रभाग क्रमांक आठमधून सामाजिक कार्यकर्ते सुदाम साळुंखे हे प्रभागाच्या विकासासाठी यंदा निवडणुकीत उतरणार होते. त्यांनी गेल्या पाच वर्षापासून तशी तयारी देखील केली होती. मात्र या प्रभागामध्ये महिला आरक्षण निश्चित झाल्यानंतर सुदाम साळुंखे यांच्या जागी त्यांच्या मातोश्री सौ सुनीता आत्माराम साळुंखे यांची उमेदवारी देण्याच्या हालचाल सुदाम साळुंखे व त्यांच्या मित्रमंडळींकडून सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सौ. साळुंखे यांच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यामुळे या प्रभागात लक्षवेधी निवडणूक होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे.
सुदाम साळुंखे हे गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने समाजकारण करत, प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत, विकासासाठी तळमळीने झटणारे युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून नावारूपाला आले आहेत. एखाद्याच्या सुखात एकवेळ कमी मात्र दुःखात न बोलवता हजर असणारा चेहरा म्हणजे सुदाम साळुंखे. समाजाच्या हिताच्या गोष्टींना प्राधान्य मिळावे यासाठी त्यांची तळमळ नेहमीच असते. सुदाम साळुंखे हे या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमधून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. त्यांनी यासाठी जोरदार तयारीही केली होती आणि त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबाही मिळत होता. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर प्रभागामध्ये आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक आठ हा महिलांसाठी राखीव झाल्याने, सुदाम साळुंखे यांच्या निवडणूक लढवण्याच्या इच्छेला तात्पुरता ब्रेक लागला. ही बातमी त्यांच्या मित्रमंडळी व समर्थकांसाठी काहीशी निराशाजनक होती, परंतु सुदाम साळुंखे यांनी या परिस्थितीतही सकारात्मकता आणि दूरदृष्टी दाखवत त्यांनी आपल्या मातोश्रींना राजकारणाच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाला प्रभाग क्रमांक आठ मधील मित्रमंडळीसह कराड शहरातील हितचिंतकांनी देखील वाढता पाठिंबा मिळत आहे.
सुदाम साळुंखे यांनी गेली १५ वर्षे प्रभागात केलेल्या समाजकार्याचा ठसा उमटवला आहे. पाणीप्रश्न असो, गटारींची समस्या असो, रस्त्यांची दुरुस्ती असो किंवा इतर कोणतीही नागरिक समस्या असो, सुदाम साळुंखे नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावून गेले आहेत. त्यांची ही तळमळ आणि विकासाची दृष्टी यामुळे ते प्रभागात लोकप्रिय आहेत. प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्यानंतरही ही विकासाची गती थांबायला नको आणि त्यांनी पाहिलेले प्रभागाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण व्हायला हवे, या उदात्त हेतूने त्यांनी एक धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
*आईच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा*
सुदाम साळुंखे यांनी आता आपल्या मातोश्री, सौ. सुनीता आत्माराम साळुंखे यांना प्रभाग क्रमांक आठमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. सौ. सुनीता आत्माराम साळुंखे या आपल्या मुलाच्या समाजकार्याची आणि सचोटीची साक्षीदार आहेत. मुलगा सुदाम यांच्या कार्याला त्यांनी नेहमीच अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. आता प्रत्यक्षपणे नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. या निर्णयामुळे सुदाम साळुंखे यांनी केवळ सामाजिक भान जपले नाही, तर विकासाचा वसा कुटुंबातील एका सक्षम आणि अनुभवी व्यक्तीकडे सोपवून एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. प्रभागातील नागरिकही सुदाम साळुंखे यांच्या या निर्णयाचे स्वागत करत असून, सुनीता साळुंखे यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. "सुदाम साळुंखे यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून आम्ही त्यांच्या आईंना नक्कीच निवडून देऊ," अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
0 Comments