दसऱ्याच्या दिवशी कराड शहरातील बहुतांशी नवरात्र उत्सव मंडळांनी आपल्या दुर्गादेवीला निरोप दिला. दुपारनंतर मूर्ती विसर्जनात सुरुवात झाली. सायंकाळी सहा नंतर शहर व परिसरातील अन्य दुर्गादेवीच्या विसर्जनासाठी भव्य मिरवणूक निघाल्या. या मिरवणुकांमुळे मुख्य रस्त्याला लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुर्गा विसर्जनादिवशी रात्री बारापर्यंत वाद्यांना परवानगी होती. मुख्य रस्त्यावरील सर्व मिरवणुका रंगात आल्या असतानाच पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करून रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीत सुरू असलेले स्पीकर जबरदस्तीने बंद करावयास भाग पाडले. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. वेळेआधी स्पीकर बंद केल्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुर्गादेवचे विसर्जन संयमाने केले व त्यानंतर येथील प्रतिसंगम घाटावर मंडळाचे कार्यकर्ते एकत्रित आले. कार्यकर्त्यांनी येथील शहर पोलीस स्टेशन वर मध्यरात्री दोन वाजता मोर्चा काढला. शहर पोलीस स्टेशनच्या बाहेरील रस्त्यावर शेकडो कार्यकर्त्यांनी ठाण मांडत पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत त्यांना जाब विचारला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जल्लोषात सुरू असलेल्या मिरवणुकीदरम्यान साडेअकरा वाजता पोलिसांनी अचानक डॉल्बी बंद करावयास मंडळांना भाग पाडले. त्यादरम्यान कार्यकर्त्यांशी पोलिसांची बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी काही डॉल्बीचे मिक्सर काढून घेतले तर काही ठिकाणी कॉड, वायर व मशीनही काढून घेतल्या. वेगवेगळे साहित्य काढून घेतल्यामुळे मिरवणुका बिना डॉल्बीच्या पुढे मार्गस्थ झाल्या. मात्र कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. आम्ही पोलिसांना नेहमी मदत करत आलो आहोत. मग तुम्ही वेळेआधी स्पीकर बंद करून मंडळांवर अन्याय का केला केली असा संतप्त सवाल या मोर्चेकरी कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारला.
0 Comments