युवा नेते शिवराज रामचंद्र कोळी प्रभाग १३ मधून इच्छुक..! प्रभाग १३ च्या विकासासाठी दूरदृष्टी आणि दृढनिश्चय; शिवराय युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून व्यापक सामाजिक काम


युवा नेते शिवराज रामचंद्र कोळी प्रभाग १३ मधून इच्छुक

प्रभाग १३ च्या विकासासाठी दूरदृष्टी आणि दृढनिश्चय; शिवराय युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून व्यापक सामाजिक काम

कराड : राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुकांचा तारखा जाहीर झाल्या असून आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. यादरम्यान गेल्या दहा वर्षांपासून समाजकार्यात अग्रगण्य असणारे शिवराय युथ फाउंडेशनचे सर्वेसर्वा, युवा नेते शिवराज रामचंद्र कोळी यांनी  कराड शहराच्या प्रभाग क्रमांक १३ मधून दंड थोपटले आहेत. त्यांचे वडिल व माजी नगराध्यक्ष रामचंद्र कोळी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीचा वारसा आणि स्वतःच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याचा अनुभव यामुळे शिवराज कोळी प्रभाग 13 च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहेत. म्हणूनच ते या प्रभागातून इच्छुक आहेत.
शिवराज कोळी यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. त्यांचे वडील, श्री. रामचंद्र विष्णू कोळी, हे २००६ ते २०११ या कालावधीत नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. या कार्यकाळात त्यांनी शहरासह प्रभागाच्या विकासासाठी भरीव काम केले. विशेष म्हणजे, २००८ ते २००९ या एका वर्षाच्या कालावधीत त्यांना 'कृष्णा विकास आघाडी'च्या माध्यमातून कराड शहराच्या नगराध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. या अल्प वेळेतही त्यांनी दूरदृष्टीने अनेक विकास प्रकल्प राबवून शहराच्या प्रगतीला गती दिली होती, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता सर्वश्रुत झाली होती. वडिलांच्या याच जनसेवेच्या आणि विकासाच्या ध्येयवादी परंपरेतून प्रेरणा घेऊन शिवराज यांनीही समाजकारण आणि राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला.
शिवराज कोळी हे गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या समाजकार्य एक छत्र खाली बहरत राहावे यासाठी त्यांनी 'शिवराय युथ फाउंडेशन'ची स्थापना केली आहे, ज्यातून त्यांनी अनेक विधायक कार्य हाती घेतली आहेत. दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून शेकडो गरजू रुग्णांना वेळेवर रक्ताची उपलब्धता करून जीवनदान दिले जाते. शिक्षणाचे महत्त्व ओळखून, फाउंडेशनने शाळा क्रमांक ७/१२ मधील काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली आहे.  शैक्षणिक साहित्य वाटपही करत आहेत. कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटात 'शिवराय युथ फाउंडेशन'ने अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचे कार्य केले. गरजू रुग्णांना प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. अन्नधान्य वाटप, सॅनिटायझेशन मोहीम यांसारख्या उपक्रमांनी त्यांनी समाजाला मोठा आधार दिला. अनाथ आश्रमांना आवश्यक ती मदत ते करत असतात. आपला वाढदिवस अनावश्यक खर्चात साजरा न करता, तो गरजूंच्या मदतीसाठी आणि विधायक कार्यासाठी वापरतात, जो इतरांसाठी एक आदर्श ठरला आहे.

प्रभाग १३ च्या विकासासाठी दूरदृष्टी आणि दृढनिश्चय

प्रभाग क्रमांक १३ मधील स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि विकासाच्या गतीला चालना देण्यासाठी शिवराज कोळी हे अत्यंत उत्सुक आहेत. प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा त्यांचा संकल्प आहे. 'शिवप्रतिष्ठान'च्या धारकऱ्यांचा, तसेच प्रभागातील सर्व थोरामोठ्यांचा आणि मित्रपरिवाराचा त्यांना भरभरून पाठिंबा मिळत आहे. वडिलांचा समृद्ध राजकीय सामाजिक अनुभव आणि स्वतःचा १० वर्षांचा प्रदीर्घ समाजसेवेचा अनुभव यामुळे शिवराज कोळी हे प्रभाग १३ साठी एक सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.

Post a Comment

0 Comments