सौ. देवयानी डुबल यांच्या उमेदवारीसाठी सर्वपक्षीय पसंती..! प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणूक लढवण्याची होतेय मागणी

देवयानी डुबल यांच्या उमेदवारीसाठी सर्वपक्षीय पसंती..! प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणूक लढवण्याची मागणी कराड: कराड नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग येऊ लागला आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक आठ (महिला आरक्षित) मधून देवयानी दिग्विजय डुबल यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू असून, त्यांना भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस आणि लोकशाही आघाडीसह सर्वच प्रमुख पक्ष व आघाड्यांकडून उमेदवारीसाठी पसंती दिली जात आहे. त्यांच्या उमेदवारीवर लवकरच निश्चिती होणार असून त्या कोणत्या पक्षातून वा आघाडीतून निवडणुकीला सामोरे जाणार हे लवकरच समोर येणार आहे. मात्र प्रभाग 8 मधून सध्या तरी त्यांचे नाव अग्रस्थानी आहे. देवयानी डुबल यांच्या उमेदवारीमागे त्यांच्या कुटुंब व भावकीचा भक्कम राजकीय आणि सामाजिक वारसा आहे. त्यांचे सासरे, शहाजी डुबल हे कराड शहरातील एक अत्यंत अनुभवी आणि सन्माननीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी यापूर्वी कराड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रभागात अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे केली होती. रस्ते, पाणी, स्वच्छता अशा मूलभूत सुविधांपासून ते प्रभागाच्या सौंदर्यीकरणापर्यंत अनेक प्रकल्पांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या या कार्यामुळे आणि मनमिळाऊ स्वभावमुळे त्यांचा शहरात, विशेषतः प्रभागात, मोठा मित्रपरिवार आणि जनसंपर्क आहे. त्यांच्या या अनुभवाचा आणि लोकप्रियतेचा फायदा देवयानी डुबल यांना निश्चितच होणार आहे. तसेच देवयानी यांचे पती, दिग्विजय डुबल हे देखील कराडमधील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सक्रिय आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. तरुणांचे संघटन देखील त्यांचे चांगले असून, अनेक सामाजिक समस्यांवर ते आवाज उठवत असतात. वास्तविक पाहता, प्रभाग क्रमांक आठमधून दिग्विजय डुबल स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक होते आणि त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली होती. मात्र, प्रभाग क्रमांक आठ महिलांसाठी आरक्षित झाल्याने, आता त्यांच्या पत्नी देवयानी डुबल यांच्या नावाला प्राधान्य दिले जात आहे. शहाजी डुबल, दिग्विजय डुबल यांच्यासह त्यांच्या समर्थक व मित्रमंडळींकडून प्रभाग क्रमांक आठमधील मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेत आहेत. त्यांनी लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केल्याने, त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
देवयानी दिग्विजय डुबल यांना सर्वच प्रमुख पक्ष आणि आघाड्यांकडून पसंती मिळण्यामागे अनेक कारणे आहेत. मजबूत राजकीय पार्श्वभूमी: शहाजी डुबल यांच्या राजकीय वारशामुळे त्यांना निवडणुकीचा आणि प्रभागाचा अभ्यास आहे. सामाजिक कार्याची जाण: दिग्विजय डुबल यांच्या सक्रियतेमुळे त्यांना लोकांच्या समस्यांची आणि अपेक्षांची जाणीव आहे. स्वच्छ प्रतिमा: डुबल कुटुंबाची शहरात एक स्वच्छ आणि प्रामाणिक प्रतिमा आहे, जी प्रभाग 8 मधील मतदारांना आकर्षित करू शकते. कार्यक्षमतेची शक्यता: कुटुंबातील सदस्यांच्या अनुभवामुळे त्या प्रभागासाठी प्रभावीपणे काम करू शकतील अशी अपेक्षा आहे. महिला आरक्षणाचा लाभ: प्रभाग 8 हा महिलांसाठी आरक्षित असल्याने, त्यांच्यासाठी उमेदवारीची संधी निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments