रेठरे बुद्रुक येथील विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांना निवेदन.

रेठरे बुद्रुक येथील विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांना निवेदन.रेठरे बुद्रुक येथील विकास कामासाठी निधी मंजूर करावा अशा या आशयाचे निवेदन पत्र सरपंच सौ सुवर्णा कापूरकर यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले यावेळी कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते उपस्थित होते. खासदार साहेबांना दिलेल्या निवेदनात विविध प्रस्तावित कामे सुचवले आहेत. गावामध्ये अतुल भोसले व मदनराव मोहिते यांच्या माध्यमातून अनेक नागरी सुविधेची कामे झाली असून अजून आणि विकास काम शिल्लक आहे व मोठ्या लोकसंख्येचे गाव असल्याने अजून प्रलंबित कामे होणे अपेक्षित आहेत म्हणून या कामाकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे असे निवेदनात मागणी करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर नाक्यावरील अपघातात दांपत्य जागीच ठार

नव्या अटी व शर्तीवर ग्रामीण क्षेत्रामधील कंपन्या चालू ठेवण्यासाठी परवानगी..

कराड येथे 2 अनुमानित रुग्णांना कोरोनाची लागण