प्रभाग क्रमांक 8 च्या विकासासाठी संजय चन्ने यांचा पुढाकार
नगराध्यक्षांकडे केली प्रलंबित विकासकामांची मागणी
कराड/प्रतिनिधी - शहरातील प्रभाग 8 मधील प्रलंबित व आवश्यक ती कामे लवकरात लवकर सुरू करावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय चन्ने यांनी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्याकडे केली आहे. त्यावर प्रभाग 8 सह शहराच्या विकासासाठी आपण लागेल ती मदत करू असे आश्वासन ही यादव यांनी दिले.
यशवंत आघाडीचे समर्थक संजय चन्ने हे प्रभाग क्रमांक 8 मध्ये नवीन नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. संजय चन्ने हे शहरातील सजग सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांशी समन्वय साधत आपले सामाजिक काम गेली 15 वर्ष अविरत चालू ठेवले आहे. या प्रभागासाठी आवश्यक असणाऱ्या कामाची यादीच त्यांनी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना सादर केली आहे. ती कामे लवकरच सुरू व्हावीत यासाठी त्यांचा पाठपुरावा देखील सुरू आहे.
त्या कामांमध्ये तवर गल्ली नाईकबा मंदिरापासून ते शिंदे गल्ली ते निकम पार्किंग पर्यंतचे कार्पेट करणे, तवर गल्ली शिंदे वाडा पर्यंत सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे, कदम वाडा ते अंतर्गत डुबल गल्ली, पेंढारकर बोळ येथे डांबरीकरण करणे, पंढरपूर अर्बन बँक ते बटाने मंदिर याठिकाणी डांबरीकरण करणे, बटाने गल्लीतील बागवान बोळ ते आर्टिस्टिक टेलर पर्यंत काँक्रिटीकरण करणे, भैया बडे ते अण्णा वाघ एकांडे बोळ येथे कार्पेट करणे तसेच बंदिस्त गटाराची देखील मागणी असून त्यात होमकार घर ते महादेव मंदिर पर्यंत दोन्ही बाजूला बंधिस्त गटार करणे (अवसरे बोळ), खराडे वाडा ते संतोष सारडा पर्यंत दोन्ही बाजूला बंधिस्त गटारे करणे, विभूत बोळ ते जनकल्याण पतसंस्था पर्यंत दोन्ही बाजूला बंधिस्त गटार करणे, श्रोत्री घरासमोर ते निखिल शहा घरापर्यंत (पालकर बोळ) बंधिस्त गटार करणे आदी प्रलंबित कामे मार्गी लावण्याची मागणी आहे.
यासह स्ट्रीट लाईट बसवणे यासाठीही चन्ने यांनी पत्रव्यवहार केला आहे. यात शुक्रवार पेठ रंगारवेस महादेव मंदिर परिसरामध्ये शेजारील मैदानात हायमास्ट लाईट बसवणे, बाळनाथ बुवा मठासमोर पोल उभारून स्ट्रीट लाईट बसवणे, सर्जेराव भोसले यांच्या घरासमोर पोल उभारून स्ट्रीट लाईट बसवणे, क्षीरसागर यांच्या घरासमोर एम एस ई बी चा डांब धोकादायक स्थितीत आहे तो नवीन उभारणे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये सर्व सार्वजनिक शौचालयातील दुरुस्ती करणे, शुक्रवार पेठ शिंदे गल्लीतील शौचालयाच्या बाजूस संरक्षक भिंतीवरून खाली उतरण्यासाठी पायऱ्या स्वरूपात घाट बांधणे. दरम्यान सदर कामे लवकरच मार्गी लावू असे आश्वासन नगराध्यक्ष यादव यांनी त्यांना दिले आहे.
संजय चन्ने यांनी त्या प्रभागाच्या विकासासाठी आपले योगदान देत आपले सामाजिक कार्य चालू आहे. त्यांनी सुचवलेल्या कामांना गती मिळण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सातत्याने आजही सुरू आहे.
सी सी टीव्हीसाठीही आग्रही
शुक्रवार पेठ तवर गल्ली रंगारवेस चौकामध्ये 360 डिग्री सी सी टीव्ही बसवणे, फल्ले चौकसह गुरुवार पेठ मध्ये बटाने गल्ली विभूते बोळा मध्ये एका पोलवर दोन सीसीटीव्ही बसवने, बालाजी मंदिर चौकामध्ये पत्रा चाळ नजीक दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, चावडी चौक ते नेहरू चौक व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार लेडीज टॉयलेट उभारणे. या व अशा अनेक कामांचा चन्ने यांनी दिलेल्या कामाच्या यादीत समावेश आहे.
0 Comments