उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्या कराडला 2 सभा
तांबवेत कराड पोलिसांकडून मॉकड्रिल
सातारा : प्रतिनिधी - कराड तालुक्यातील तांबवे, उंब्रज येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर तांबवे येथे कराड पोलिसांनी DYSP राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून पथसंचलन करत मॉकड्रिल प्रात्यक्षिक केले. यावेळी गर्दी पांगवण्याचे प्रात्यक्षिक, अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर यासह विविध प्रात्यक्षिक करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
0 Comments