दोन चोरीच्या घटनांत दोघांना अटक
3.3.2020 सुरेश डुबल। युवा निर्धार
कराड,दि.2(प्रतिनिधी)
ओगलेवाडी (ता. कराड) येथे पूर्वी झालेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये पोलिसांनी दोन संशयित चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.शितल गोरख काळे (वय 35, रा. ओगलेवाडी, ता. कराड) व सूर्यकांत शेज्या भोसले (रा. फलटण) अशी चोरट्यांची नावे आहेत. यातील एका चोरट्यांकडून 10 हजार रुपयांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.कराड शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ओगलेवाडी येथे नोव्हेंबर 2019 व जानेवारी 2020 या महिन्यांमध्ये दोन चोरीच्या घटना घडल्या होत्या. या चोरी प्रकरणी संबंधितांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावरून पोलिसांचा तपास सुरू होता. तपास करत असताना संशयित चोरट्यांची नावे समोर आल्यानंतर शहर पोलिसांच्या डीबीच्या पथकाने शितल काळे व सूर्यकांत भोसले या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलिसांनी संशयित शितल काळे यांच्याकडून दहा हजार रुपयांचा मोबाईल हस्तगत केला आहे. या दोन्ही चोरट्यांकडून आणखी मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या दोन वेगळ्या चोरीच्या घटनांचा तपास एएसआय राजेंद्र पुजारी व हवालदार खराडे करत आहेत.
0 Comments