भीमशक्ती संस्थेचे चक्री उपोषण सुरू
भीमशक्ती संस्थेचे चक्री उपोषण सुरू
कराड,दि.5(प्रतिनिधी)
कराड शहरात काही दिवसापासून पालिकेने अतिक्रमण मोहीम सुरू केली आहे.ही मोहीम राबवताना नगरपालिकेने दुजाभाव दाखवत काही धनदांडग्यांची अतिक्रमणे काढलेली नाहीत. पालिकेला संबंधित प्रकरणाची माहिती देऊनही त्यांनी ती न काढल्याने आज आज गुरुवारपासून भीमशक्ती सामाजिक संस्थेकडून येथील तहसील कार्यालयासमोर चक्री आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
गुरुवारी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले आहे.जो पर्यंत पालिका सरसकट व दुजाभाव न करता अतिक्रमण काढत नाही तोवर हे चक्री उपोषण सुरू राहील असा इशारा संघटनेने दिला आहे.हॉकर्स संघटनेचे जावेद नायकवडी,प्रकाश जाधव,यांचेसह हातगाडेधारकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
Comments
Post a Comment