गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास अटक गावठी कट्ट्यासह जिवंत कडतुस जप्त ;

गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास अटक
गावठी कट्ट्यासह जिवंत कडतुस जप्त ; 

कराड,दि.5(प्रतिनिधी)
 गावटी कट्टा बाळगणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली.कोल्हापुर नाक्याजवळील साई अमृततुल्य टि सेंटर समोर आज गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली.तेजस दिलीप चव्हाण (वय 27) रा.१७६,रविवार पेठ, कराड असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की,एक युवक गावठी कट्टा घेऊन कोल्हापुर नाक्याजवळील साई अमृततुल्य टि सेंटर समोर उभा असल्याची गोपनीय  माहिती पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांना मिळाली.त्या माहितीच्या आधारावर  गुरव यांनी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी  जाऊन  पाहणी केली असता,  एक युवक  संशयास्पदरीत्या  त्या परिसरात फिरताना आढळून आला.त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळु लागला त्यावेळी छापा पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यास पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे कमरेला आतिल बाजुस एक गावटी कट्टा मिळुन आला. तसेच आणखी झाडाझडती घेतल्यावर पॅण्टचे उजवे खिशात एक जिवंत काडतुस मिळुन आले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव तेजस दिलीप चव्हाण ( वय 27)रा.१७६,रविवार पेठ, कराड असे  सांगितले. पोलिसांनी  मुद्देमालसह युवकाला अटक केली.याप्रकरणी पो. कॉ.राहुल जाधव यांनी  शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
या कारवाईमध्ये उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सुरज गरव यांचे मार्गदर्शनाखाली पो.काँ राहुल जाधव ,पो.कॉ. सागर बर्गे, पो.कॉ.दिपक साठे यांनी
सहभाग घेवुन कारवाई केली.

Post a Comment

0 Comments