जिल्ह्यात आणखी 6 कोरोना रुग्ण आढळले. कराड तालुक्यातील 5 रुग्ण ; तर फलटण ला 1
सातारा : (युवा निर्धार) कराड येथे आज 5 कोरोना बाधित म्हूणन रिपोर्ट आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.पुणे येथून प्रवास करुन आलेल्या 28 वर्षीय युवकाला दि 25 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 42 झाली आहे. यापैकी कराड तालुक्यात 30 जण कोरोना बाधित रुग्ण आहेत.कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातारा जिल्ह्यात वाढत असताना सर्वाधिक रुग्ण हे कराड तालुक्यात आढळून येत आहेत. कराडच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. पुणे येथून प्रवास करुन आलेल्या 28 वर्षीय युवकाला दि 25 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल करण्यात आले होते. हा युवक पॉझिटिव्ह (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. या रुग्णावर पुढील उपचार क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथे करण्यात येणार आहे. आतापर्यंत 5 जणांना (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहे. तर 2 जणांच