जिल्ह्यात चार रुग्ण कोरोना पॉजीटिव्ह

जिल्ह्यात चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

(युवा निर्धार न्युज नेटवर्क)

सुरेश डुबल

 सातारा - कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 10 महिन्याच्या पुरुष जातीचे बाळ व 28 वर्षीय पुरुष आणि उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 75 वर्षीय महिला तसेच उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 27 वर्षीय महिला अशा 4 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या एकूण 7 होती. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल 14 दिवसानंतर निगेटिव्ह आला असून हा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तसेच 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. 4 कोरोना संसर्गितांवर मार्गदर्शक नियमानुसार  कोटेकोरपणे निगराणीखाली उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण 8 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर नाक्यावरील अपघातात दांपत्य जागीच ठार

गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास अटक गावठी कट्ट्यासह जिवंत कडतुस जप्त ;

दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर 3/21/2020*(युवा निर्धार न्युज नेटवर्क)*