क्वाॅरंटाईन केलेल्या 21 परप्रांतियांचे कराडातून पलायन


 कराड : सुरेश डुबल (युवा निर्धार न्यूज नेटवर्क)

लॉकडाऊन असल्याने प्रशासनाने कराड तालुक्यातील आटके येथे क्वाॅरंटाईन केलेल्या 21 परप्रांतीयांनी पलायन केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी मंगळवारी पोलिसात नोंद झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पळालेल्या सर्वांवर मंगळवारी सायंकाळी कराड ग्रामिण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पळालेल्या परप्रांतियांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. 

ईसेवरमन म, जगल टी, वसंत एस, कृष्णा राजन, दिनेश डी, तमिल वरमन सी, व्यंकटेश के, अजित आर, विजय, मुकेश, सत्य नारायणवाडी, व्यंकटेश, व्यंकटेश, मुरगन, रघुकुमार, प्रदीप, पार्थी, महेश, हरो, लक्ष्मण, व अजित (पुर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी क्वाॅरंटाईन असतानाही पळालेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर अनेकजण वाहन मिळत नसल्याने पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावरून चालत आपापल्या गावी निघाले होते. त्यातील काहीजण तामिळनाडूसह इतर राज्यातील हजारो किलोमीटर प्रवास करून चालत जात होते. आशा पायी चालत जाणाऱ्या सुमारे 100 लोकांना महसूल विभागाने कराड तालुक्यातील आटके टप्पा येथील विराज मल्टीपर्पज हॉलमध्ये क्वाॅरंटाईन केले होते. तेथे त्यांच्या जेवणाखाण्याची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच त्यांच्या बंदोबस्तासाठी रात्रंदिवस पोलिसांचा पहारा होता. सोमवार दिनांक 13 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास यातील संशयित 21 जण मल्टीपर्पज हॉलच्या पाठीमागील भिंतीवरून उडी मारून पसार झाले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला. मात्र, ते आढळून आले नाहीत. त्यानंतर रात्री उशिरा सर्व 21 जणांवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर नाक्यावरील अपघातात दांपत्य जागीच ठार

गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास अटक गावठी कट्ट्यासह जिवंत कडतुस जप्त ;

दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर 3/21/2020*(युवा निर्धार न्युज नेटवर्क)*