तळीरामांनी फोडले देशी दारूचे दुकान संत्रा दारूच्या ७०२ बाटल्या चोरल्या


*कराड : सुरेश डुबल(युवा निर्धार न्युज नेटवर्क)*

देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी टँगो आणि संत्रा दारूच्या ७०२ बाटल्या मिळून तब्बल २ लाख ६५ हजाराची दारू लंपास केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरा फोडून त्यातील डीव्हीआर मशीन आणि टीव्हीसुध्दा चोरट्यांनी नेला आहे. दुकान मालक सर्जेराव शामराव पाटील (रा. गोवारे, ता. कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांची माहिती अशी की,दुकान मालकाचा पुतण्या हर्षवर्धन याने शनिवारी सकाळी चुलते सर्जेराव पाटील यांना फोन करून दुकानाचे शटर उचकटल्याची माहिती दिली. त्यानंतर ते दुकानाकडे आले आणि कराड शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस आल्यानंतर दुकानात जाऊन पाहिले असता सीसीटीव्ही कॅमेरे फोडून त्यातील डीव्हीआर मशीन तसेच टीव्ही आणि दारूच्या ७०२ बाटल्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. लॉकडाऊनपासून दुकान बंद होते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी दुकान फोडून तब्बल २ लाख ६५ हजाराची दारू लंपास केली आहे. याप्रकरणी अज्ञातांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर नाक्यावरील अपघातात दांपत्य जागीच ठार

गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास अटक गावठी कट्ट्यासह जिवंत कडतुस जप्त ;

दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर 3/21/2020*(युवा निर्धार न्युज नेटवर्क)*