कराडात जुगार अड्यावर छापा



कराड ,दि.6(युवा निर्धार न्युज नेटवर्क)
 येथील मार्केट यार्डमधील झोपडपट्टीतील झाडाखाली जुगार खेळणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली केली.यात जुगाराचे साहित्य, वाहने व अन्य साहित्य असा 83 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की , मार्केट यार्डमधील गेट नंबर एकच्या समोरील झोपडपट्टील झाडाखाली आठजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक गुरव यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने संबंधित ठिकाणी छापा टाण्याचे आदेश त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे बसराज भिमशा वालेकर (वय 36, रा. बैलबाजार रोड, कराड), आसिफ इकबाल पटवेकर (40, मुजावर कॉलनी), राजशेखर महादेव तलवार(34), सलीम साहेबराव शेख (31), महिबुब, अलिसाब आत्तार (30), सलीम दस्तगीर छबनुर (29), मस्तान फकरुद्दीन आत्तार (32, सर्व रा. मार्केट यार्ड झोपडपट्टी) व फिरोश रशीद शेख (31, शनिवार पेठ, कराड) हे जुगार खेळताना मिळुन आले. त्यांना ताब्यत घेण्यात आले असुन पोलिस कर्मचारी सागर बर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांकडुन 83 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी प्रविण पवार, श्री. बर्गे, दिपक कोळी, सौरभ कांबळे यांनी ही कारवाई केली.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर नाक्यावरील अपघातात दांपत्य जागीच ठार

नव्या अटी व शर्तीवर ग्रामीण क्षेत्रामधील कंपन्या चालू ठेवण्यासाठी परवानगी..

कराड येथे 2 अनुमानित रुग्णांना कोरोनाची लागण