कराड येथे 2 अनुमानित रुग्णांना कोरोनाची लागण


(युवा निर्धार न्यूज नेटवर्क)

सातारा (जिमाका) दि.19: कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 35 वर्षीय पुरुष आणि उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 30 वर्षीय पुरुष अशा दोघा अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट कोरोना (कोव्हिड 19) पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले असून हे दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 रुग्णालयात दाखल असलेल्या या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमानुसार निगराणीखाली उपचार सुरु आहेत.

Post a Comment

0 Comments