*सोशल मीडियावर बदनामी ; एकावर गुन्हा*
कराड :(युवा निर्धार न्युज नेेेटवर्क)
कराड परिसर हा भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले यांच्यामुळेच सील झाला. अशा प्रकारचा बदनामीकारक मेसेज व्हॉटसअॅपवर व्हायरल करून भोसले यांनी बदनामी करणाऱ्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. बलराज पाटील (पूर्ण नाव नाही) असे संबंधिताचे नाव आहे. त्याने 2024 ला येणारे वादळ या व्हॉटस् ग्रुपवर मेसेज टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कृष्णा हॉस्पीटलचे सुरक्षा अधिकारी विलास चव्हाण यांनी त्याबाबतची फिर्याद दिली आहे.
पोलिसांची माहिती अशी की, भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले यांच्या विरोधात बदनामी करणारा आणि त्यांच्यामुळे कराड परिसर सील झाल्याचा मेसेज बलराज पाटील यांनी पोस्ट केला आहे. तो मेसेज त्यांनी 23 एप्रिलला दुपारी पावणे तीनच्या सुमारास 2024 ला येणारे वादळ या ग्रुपवर पाठवला आहे. त्यात डॉ.अतुल भोसले यांची नाहक बदनामी झाली आहे. वास्तविक कोरोनाच्या लढ्यात कृष्णा हॉस्पीटल व त्याचे सर्व कर्मचारी अत्यंत जीगरबाजपणे लढा देत आहेत. सर्व डॉक्टर्स, कर्मचारी जीवाचे रान करून कोरोनोशी दोन हात करत आहेत. अशा स्थितीत कृष्णा हॉस्पिटलचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांच्या विरोधात सोशल मिडीयावर बदनामी करणारा मेसेज व्हायरल होत आहे. ती बदनामी करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करावी. असे फिर्यादीत म्हटले आहे.
Comments
Post a Comment