कृष्णा हॉस्पिटलमधून आणखी 11 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज
*कृष्णा हॉस्पिटलमधून आणखी 11 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज*
कराड:युवा निर्धार न्यूज नेटवर्क
सातारा जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे शतक पूर्ण केलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलने सलग दुसऱ्या दिवशीही आपली कोरोनामुक्तीची वाटचाल कायम ठेवली आहे. आजदेखील कृष्णा हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त झालेल्या 11 रुग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये म्हासोली येथील 55 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 55 महिला, 9 वर्षीय मुलगा, इंदोली येथील 37 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलगी, खालकरवाडी-चरेगाव येथील 25 वर्षीय युवक, शिराळ-पाटण येथील 25 वर्षीय युवक, खळे-पाटण येथील 21 वर्षीय युवती, बनपुरी-पाटण येथील 16 वर्षीय मुलगा अशा 11 जणांचा समावेश आहे. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 111 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
या कोरोनामुक्त रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. रजनी गावकर, अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्या डॉ. वैशाली मोहिते, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर, नीलम पाटील यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.
Comments
Post a Comment