ऑनलाईन बुकींगद्वारे विनापास प्रवाशी वाहतुक करणारी टोळी अटकेत कराड शहर गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई
कराड, दि. 23 (युवा निर्धार न्युज) ः राज्यात जिल्हा बंदी असताना ऑनलाईन बुकींग करून ज्यादा दराने विनापासचे प्रवाशी वाहतुक करणारी चारचाकी कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने येथील कोल्हापूर नाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतली. यामध्ये एक ड्रायव्हर व एक एजंट ताब्यात घेण्यात आला आहे.
अनंता उर्फ निलेश अशोक माने (वय 36 ) व्यवसाय टूर्स् ॲड ट्रॅव्हल्स रा, खराडे कॉलनी
मार्केटयार्ड कराड, विकी ( पुर्ण नाव पत्ता माहिती नाही. ), अश्पाक दस्तगीर नायकवडी रा. शाहुचौक कराड ,चालक दिपक सदाशिव जावीर रा. कामोडी सेक्टर 11 यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,
सध्या पर जिल्ह्यात प्रवास करण्याकरीता पासची आवश्यकता आहे. असे असताना सुद्धा विटा-कराड-मुंबई असे प्रवास करण्याकरीता पासची आवश्यकता असताना सुद्धा विनापास प्रवासि वाहतूक करून प्रत्येकी इसम 2000 रुपये अशी रक्कम घेवून समर्थ ट्रॅव्हर्ल्स नावाने ऑनलाईन बुकींग करून विनापास प्रवासी वाहतूक सुरू असते.अशी गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव व वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांना मिळाली.त्यांनी याबाबतची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय गोडसे व पथकास दिली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.कॉ.विनोद माने व तानाजी शिंदे यांनी प्रवासी म्हणून समर्थ ट्रॅव्हर्ल्स चे मालक अनंता उर्फ निलेश यांना संपर्क केला.तेव्हा कराड येथून मुंबईला जाणेकरीता पासची आवश्यकता नाही. परंतु आपणास तिकीट दर म्हणून 500 रुपयाचे ठिकाणी 2000 रुपये लागतील बाकी आम्ही सर्व मॅनेज करतो असे समोरून सांगण्यात आले.
त्या दोन पोलीसांनी समर्थ ट्रॅव्हल्स कराड यांचेकडे ऑनलाईन दोन जागांची बुकींग केली. त्यांच्या सांगण्यानुसार गुगल पे वर 1000 रुपये डिपॉझिटही जमा केले.त्यानंतर प्रवासी पोलीसांना मंगळावर दि.23 रोजी दुपारी 12 वाजता कोल्हापूर नाका कराड येथ हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार प्रवासी पोलीस सदरठिकाणी प्रवासी म्हणून हजर राहिले. तेव्हा त्यांच्या चैन मधील स्थानिक एजंट अश्पाक हा प्रवाश्या जवळ आला व आपली ओळख देवून उभ्या असलेल्या प्रवाश्यांना इनोव्हा गाडी क्र.( एम एच 43 डी 8877 )मध्ये बसवले. त्याचवेळी कोल्हापूर नाका येथे तपासणी करता असलेले स.पो.नि. विजय गोडसे,पोलीस नाईक संजय जाधव , सचिन साळुंखे या पथकाने ट्रॅप करून कोरोणा अनुषंगाने विना पास प्रवास करुन प्रवासी घेवून मुंबई येथे जाणाऱ्या समर्थ ट्रॅव्हल्सच्या ऑनलाईन रॅकेट करणाऱ्या चार इसमांना ताब्यात घेतले. चौकशी अंती ते संशयित ऑनलाईन बुकींग घेवून विना पास प्रवाश्यांना कराड ते मुंबई असे प्रत्येक शिटमागे 2000 रुपये दराने प्रवाशी वाहतुक करत असल्याचे मिळून आले. त्यांच्यावर शहर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना मिळालेल्या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, वरिष्ठ पेालीस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी शिंदेे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, मारुती लाटणे यांच्या पथकाने केली आहे.
------------------------------------------------------------------------------
*पोलीसांकडून आवाहन*
कोरोणो अनुषंगाने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणेकरीता ऑनलाईन पासची आवश्यकता आहे. सदर बाबत ऑनलाईन पास घेवून प्रवास करावा. असे खोटी माहिती देवून ऑनलाईन बुकींग करणाऱ्या कोणत्याही ट्रॅव्हल्स कडे बुकींग करू नये. असे कोणी करत असल्यास याबाबत पोलीस विभागासमाहिती द्यावी पेालीस विभागाकडून योग्य ती कारवाई करणेत येईल.
Comments
Post a Comment