कृष्णा कारखान्यात ऊसतोडणी वाहतूक करारास प्रारंभ
शिवनगर, ता. 11 (युवा निर्धार न्युज नेटवर्क)यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 या गळीत हंगामाकरिता ऊसतोडणी वाहतूक करारांचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक जितेंद्र पाटील, संजय पाटील, निवासराव थोरात, गुणवंतराव पाटील, पांडूरंग होनमाने, गिरीष पाटील, सुजित मोरे, ब्रिजराज मोहिते, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, बहेचे उपसरपंच मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऊस हे शाश्वत पीक असून शेतकर्याला चांगले पैसे मिळवून देते. ऊसतोडणी वाहतूक हा शेतकर्यांसाठी जोड व्यवसाय म्हणून करता येतो. ज्यामुळे शेतकर्यांची चांगली प्र्र्र्र्रगती होत आहे. कृष्णा कारखाना ऊसतोडणी वाहतूकदार व कंत्राटदारांना जास्तीत जास्त सहकार्य करेल अशी ग्वाही चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांनी यावेळी दिली.
संचालक जितेंद्र पाटील म्हणाले, चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने शेतकर्यांना गेली पाच वर्षे चांगला दर दिला आहे. त्याचबरोबर नेहमीच शेतकरी सभासदहितास प्राधान्य दिले आहे. कोरोनामुळे कारखान्यापुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतू शेतकी विभाग व तोडणी वाहतूकदार यांच्या उत्कृष्ट नियोजनाने हंगाम यशस्वी पार पडला आहे.
कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी म्हणाले, चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने नोटराइज्ड-ई करारास प्रारंभ केला. ज्यामुळे करारात पारदर्शकता आली आहे. गेल्या पाच वर्षात ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेची येणेबाकी शून्य रूपये आहे. हा कृष्णा कारखान्याने साखर कारखानदारी समोर घालून दिलेला एक आदर्श आहे. कारखाना प्रशासन शेतकर्यांना जास्तीत जास्त ऊस उत्पादनसाठी जयवंत आदर्श कृषी योजनेअंतर्गत मार्गदर्शन करत आहे. ज्यामुळे शेतकरी सभासदांचे एकरी उत्पादन वाढीसाठी मदत होत आहे.
यावेळी सेके्रटेरी मुकेश पवार, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, लेबर अॅन्ड वेल्फेअर ऑफिसर अरूण पाटील ,वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षल निकम आदीसह अधिकारी, ऊसतोडणी वाहतूकदार व कंत्राटदार उपस्थित होते. कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. सेेक्रेटेरी मुकेश पवार यांनी सुत्रसंचालन केले. संचालक संजय पाटील यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment