चक्रीवादळानंतर करावयाचे शेतीचे नियोजनाचे ध्वनी चर्चा सत्र संपन्न


सातारा :- युवा निर्धार न्युज नेटवर्क
रिलायन्स फौंडेशन महिती सेवा आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठीनिसर्ग चक्रीवादळानंतर करावयाचे शेतीचे नियोजन ध्वनी चर्चा सत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा व कृषि विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने निसर्ग चक्रीवादळानंतर करावयाचे शेतीचे नियोजन कसे करावे यासाठी मा. चंद्रकांत कोळी, मंडल कृषि अधिकारी, कृषि विभाग यांनी सातारा ,वाई,कोरेगांव ,कराड तालुक्यात वारा व मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस यामुळे ऊस पीक खाली पडले आहे त्याच्यासाठी योग्य शिफारस, तसेच आले लागवड झाली आहे त्याला कंदकुज येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी. तसेच ज्यांची हळद लागवड झाली आहे त्यांना उगवण क्षमतेमध्ये वाढ होण्याकरिता सल्ला देण्यात आला.आंबा पीक फळ काढण्याच्या अवस्थेत आहे त्या फळाची काय दक्षता कशी घ्यायची याबाबत सखोल मार्गदर्शन केले. हे ध्वनि चर्चा सत्र योग्य वेळी व लगेच वादळानंतर आयोजित केलयाने शेतकरी वर्ग खुश आहे. त्यांना वेळेत मार्गदर्शन मिळाल्याने ते आपलया पिकाला या परिस्थितीत वाचऊ शकतील. त्यामुळे श्री. कोळी, मंडल कृषि अधिकारी यांनी दिलेला सल्ला निच्छितच मार्गदर्शक ठरेल. 
हे ध्वनि चर्चासत्र शेतकर्‍यांना खरीप हंगाम नियोजन करताना खूप उपयुक्त ठरणार आहे. असे मत यावेळी सचिन मताले, कृषि तज्ञ , रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा यांनी दिली. यावेळी रिलायन्स फाऊंडेशन चे जिल्हा व्यवस्थापक मा. मारुती खडके व निवास निकम यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर नाक्यावरील अपघातात दांपत्य जागीच ठार

गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास अटक गावठी कट्ट्यासह जिवंत कडतुस जप्त ;

दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर 3/21/2020*(युवा निर्धार न्युज नेटवर्क)*