पालकर शाळेत चिमुकल्यांची दहीहंडी उत्साहात

पालकर शाळेतील चिमुकल्यांची दहीहंडी जल्लोषात कराड/ प्रतिनिधी - श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून अनुसया काशिनाथ पालकर आदर्श शिशु विहार, कराड येथे शुक्रवारी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडीच्या निमित्ताने शाळेच्या पटांगणात मधोमध दहीहंडी बांधण्यात आली होती. ‘आला रे आला, गोविंदा आला’ या गाण्याच्या तालावर संपूर्ण शाळेचे वातावरण उत्साहाने दुमदुमून गेले. मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी राधेची, तर विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाची वेशभूषा केली होती. ‘जो है अलबेला’ या गाण्यावर राधा-कृष्णाच्या वेशातील चिमुकल्यांनी मनमोहक नृत्य सादर केले. त्यानंतर ‘आला रे आला, गोविंदा आला’च्या गजरात पालकर शाळेच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडत उत्सवाची सांगता केली.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पालकर, सचिव सुरेखा पालकर, उपाध्यक्ष जयंत पालकर, विठ्ठलराव शिखरे, सहसचिव खोचीकर सर, तसेच संचालक कालवडेकर सर, शेवाळे सर, दीक्षित सर, खेडेकर सर, धोंगडी सर, पावसकर सर, वऱ्हाडकर सर, टकले सर, संचालिका वैशाली पालकर व राजश्री पालकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वर्षाराणी पवार तसेच त्यांच्या सहकारी शिक्षिका, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सोमती पाटील, शिक्षिका कविता कानापडे, वैशाली वास्के, स्वप्नाली जाधव तसेच कर्मचारी लक्ष्मीबाई रोडगे व सुप्रिया कुलकर्णी यांच्या सहकार्याने दहीहंडीचा कार्यक्रम आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Post a Comment

0 Comments