Posts

Showing posts from 2020

कोल्हापूर नाक्यावरील अपघातात दांपत्य जागीच ठार

Image
कोल्हापूर नाक्यावरील अपघातात दाम्पत्य ठार कराड दि.20 (युवा निर्धार)- येथील कोल्हापूर नाक्यावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने काले ता.कराड येथिल दांपत्याचा जागीच मृत्यू झाला.आज रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आज रविवारी साडेतीन वाजण्याच्या सूमारास काले येथून दांपत्य टीव्हीएस मोपेड क्र.MH-50-J-7642 वरुन कराड कडे येत होते.कोल्हापूर नाक्यावरील पूलाखालून शहरात येत असताना सातारा बाजूकडे वेगाने जाणार्‍या ट्रकने दूचाकीला धडक दिली, या धडकेत दूचाकीसह दोघांना ट्रकने काही अंतर फरपटत नेले. महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

शहरातील कोविड सेंटरमध्ये महिला पोलीसांची नियुक्ती करा भाजपच्या महिला मोर्चा आघाडीची निवेदनाद्वारे मागणी

Image
शहरातील कोविड सेंटरमध्ये महिला पोलीसांची नियुक्ती करा  भाजपच्या महिला मोर्चा आघाडीची निवेदनाद्वारे मागणी : सीसीटीव्ही व रात्रगस्तही सुरू करा, दुर्लक्ष केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा  कराड/प्रतिनिधी :          राज्यातील अनेक कोविड सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या हे प्रकारे रोखण्यासाठी प्रत्येक कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. तसेच महिला रुग्णांच्या सुरक्षिततेकरिता त्याठिकाणी 24 तास महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून रात्रीच्या वेळेस महिला पोलीसांमार्फत गस्तही घालण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चा आघाडीतर्फे कराड शहराध्यक्ष सीमा घार्गे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.          सदर निवेदन मंगळवारी 22 रोजी देण्यात आले. यावेळी महिला मोर्चाच्या अन्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या. भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा उषा खापरे यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भातील मागणीचे निवेदन दिले होते. त्यानुसार तालुका पातळीव

ऑनलाईन बुकींगद्वारे विनापास प्रवाशी वाहतुक करणारी टोळी अटकेत कराड शहर गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई

Image
कराड, दि. 23 (युवा निर्धार न्युज) ः राज्यात जिल्हा बंदी असताना ऑनलाईन बुकींग करून ज्यादा दराने विनापासचे प्रवाशी वाहतुक करणारी चारचाकी कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने येथील कोल्हापूर नाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतली. यामध्ये एक ड्रायव्हर व एक एजंट ताब्यात घेण्यात आला आहे.  अनंता उर्फ निलेश अशोक माने (वय 36 ) व्यवसाय टूर्स् ॲड ट्रॅव्हल्स रा, खराडे कॉलनी  मार्केटयार्ड कराड, विकी ( पुर्ण नाव पत्ता माहिती नाही. ), अश्पाक दस्तगीर नायकवडी रा. शाहुचौक  कराड ,चालक दिपक सदाशिव जावीर रा. कामोडी सेक्टर 11 यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  सध्या पर जिल्ह्यात प्रवास करण्याकरीता पासची आवश्यकता आहे. असे असताना सुद्धा विटा-कराड-मुंबई असे प्रवास करण्याकरीता पासची आवश्यकता असताना सुद्धा विनापास प्रवासि वाहतूक करून प्रत्येकी इसम 2000 रुपये अशी रक्कम घेवून समर्थ ट्रॅव्हर्ल्स नावाने ऑनलाईन बुकींग करून विनापास प्रवासी वाहतूक सुरू असते.अशी गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव व वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांना मिळाली.त्यांनी य

कृष्णा कारखान्यात ऊसतोडणी वाहतूक करारास प्रारंभ

Image
शिवनगर, ता. 11 (युवा निर्धार न्युज नेटवर्क) यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 या गळीत हंगामाकरिता ऊसतोडणी वाहतूक करारांचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक जितेंद्र पाटील, संजय पाटील, निवासराव थोरात, गुणवंतराव पाटील, पांडूरंग होनमाने, गिरीष पाटील, सुजित मोरे, ब्रिजराज मोहिते, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, बहेचे उपसरपंच मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी चेअरमन डॉ.सुरेश भोसले म्हणाले, गेल्या गळीत हंगामावर महापूर, कोरोना विषाणू या आपत्तींचे संकट असताना आपण सर्व ऊसतोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांच्या सहकार्यामुळे हंगाम यशस्वी पार पाडू शकलो. या कोरोनाच्या संकटामुळे सर्व व्यवसायांना अडचणी आल्या आहेत. त्याचप्रमाणे येणारा काळ हा साखर कारखानदारीसाठी आव्हानात्मक राहणार आहे. ऊस हे शाश्‍वत पीक असून शेतकर्‍याला चांगले पैसे मिळवून देते. ऊसतोडणी वाहतूक हा शेतकर्‍यांसाठी जोड व्यवसाय म्हणून करता येतो. ज्यामुळे शेतकर्‍यांची चांगली प्र्र्र्र्रगती होत आहे. कृष्णा कारखाना ऊसतोडणी वाहतूकदार व कंत्राटदारांना

चक्रीवादळानंतर करावयाचे शेतीचे नियोजनाचे ध्वनी चर्चा सत्र संपन्न

Image
सातारा :- युवा निर्धार न्युज नेटवर्क रिलायन्स फौंडेशन महिती सेवा आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठीनिसर्ग चक्रीवादळानंतर करावयाचे शेतीचे नियोजन ध्वनी चर्चा सत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा व कृषि विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने निसर्ग चक्रीवादळानंतर करावयाचे शेतीचे नियोजन कसे करावे यासाठी मा. चंद्रकांत कोळी, मंडल कृषि अधिकारी, कृषि विभाग यांनी सातारा ,वाई,कोरेगांव ,कराड तालुक्यात वारा व मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस यामुळे ऊस पीक खाली पडले आहे त्याच्यासाठी योग्य शिफारस, तसेच आले लागवड झाली आहे त्याला कंदकुज येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी. तसेच ज्यांची हळद लागवड झाली आहे त्यांना उगवण क्षमतेमध्ये वाढ होण्याकरिता सल्ला देण्यात आला.आंबा पीक फळ काढण्याच्या अवस्थेत आहे त्या फळाची काय दक्षता कशी घ्यायची याबाबत सखोल मार्गदर्शन केले. हे ध्वनि चर्चा सत्र योग्य वेळी व लगेच वादळानंतर आयोजित केलयाने शेतकरी वर्ग खुश आहे. त्यांना वेळेत मार्गदर्शन मिळाल्याने ते आपलया पिकाला या परिस्थितीत वाचऊ शकतील. त्यामुळे श्री. कोळी,

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर आता बसणार प्रशासक

Image
राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांबद्दल मोठा निर्णय मंत्र्यांनी दिली माहिती आहे.राज्यात जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्या निवडणुका सहा महिने लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. मुंबई-प्रतिनिधी राज्यातील कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव पाहता तो रोखण्याच्या अनुषंगाने राज्यात जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान प्रस्तावित असलेल्या 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची विनंती विनंती राज्य शासनाने राज्य निवडणुक आयोगास केली होती. यावर विचार केल्यानंतर या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्यावयाच्या झाल्यास त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक यंत्रणेवर ताण, वोटींग मशिनचा सामुदायिक वापर, प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, मेळावे, पदयात्रा या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकत्र येण्याची श

कृष्णा हॉस्पिटलमधून आणखी 11 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज

Image
*कृष्णा हॉस्पिटलमधून आणखी 11 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज* कराड:युवा निर्धार न्यूज नेटवर्क सातारा जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे शतक पूर्ण केलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलने सलग दुसऱ्या दिवशीही आपली कोरोनामुक्तीची वाटचाल कायम ठेवली आहे. आजदेखील कृष्णा हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त झालेल्या 11 रुग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.   आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये म्हासोली येथील 55 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 55 महिला, 9 वर्षीय मुलगा, इंदोली येथील 37 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलगी, खालकरवाडी-चरेगाव येथील 25 वर्षीय युवक, शिराळ-पाटण येथील 25 वर्षीय युवक, खळे-पाटण येथील 21 वर्षीय युवती, बनपुरी-पाटण येथील 16 वर्षीय मुलगा अशा 11 जणांचा समावेश आहे. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 111 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या कोरोनामुक्त रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. रजनी गावक

*कोरोनामुक्तीच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटल शंभरी पार* 19 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज; जिल्हाधिकाऱ्यांनी केले विशेष कौतुक

Image
कराड/युवा निर्धार न्युज नेटवर्क सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 19 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 100 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कोरोनामुक्तीच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या योगदानाचे विशेष कौतुक जिल्हाधिकारी शेखर सेह यांनी केले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठा हाहाकार निर्माण केला. अगदी पहिल्या टप्प्यातच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा तुलनेने सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यातही कराडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदविस वाढू लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरले. दरम्यान, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचारास प्रारंभ झाला आणि 18 एप्र

चित्रांना मिळालेला मोबदला थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीतसंवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांचा उपक्रम

Image
चित्रांना मिळालेला मोबदला थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीत संवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांचा उपक्रम तळमावले/वार्ताहर संकटातही संधी शोधा असे म्हटले जाते, त्या अनुषंगाने सध्याच्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर आपणही काहीतरी योगदान द्यावे या भावनेतून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड होल्डर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी कुंचल्याच्या माध्यमातून मदत केली आहे. लाॅकडाऊनच्या काळात घरबसल्या चित्रे रेखाटत त्यातून मिळालेला रु.4,000/- चा संपूर्ण मोबदला मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोवीड 19 मध्ये जमा केला आहे. डाॅ.डाकवे हे नेहमी विविध समाजाभिमुख उपक्रम राबवत असतात. लाॅकडाऊनच्या काळात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी ‘एक रेखाचित्र कोरोना विरुध्दच्या योद्यांसाठी’ हा अभिनव उपक्रम सुरु केला होता. यामध्ये डाकवे यांचेकडून रेखाचित्र करुन घेवून त्याचे मुल्य स्वीकारण्यात येत होते. या माध्यमातून जमा झालेली रक्कम नुकतीच मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे. दरम्यान, कोरोना परिस्थितीच्या कालावधीत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पोलीसांना मास्क वाटप, कृतज्ञ

मुळगाव कर्नाटक ,रहावयास गुजरातमध्ये , दफन विधी कराडमध्ये लोकडाऊनमुळे दोन दिवस मृतदेहाची हेळसांड ; स्वतःच्या राज्यानेही प्रवेश नाकारला,कराड ने दिला सहारा कराड -युवा निर्धार न्युज नेटवर्क, सुरेश डुबल

Image
मुळगाव कर्नाटक ,रहावयास गुजरातमध्ये ,  दफन विधी कराडमध्ये लोकडाऊनमुळे दोन दिवस मृतदेहाची हेळसांड ;  स्वतःच्या राज्यानेही प्रवेश नाकारला,कराड ने दिला सहारा कराड - सुरेश डुबल कोरोना महामारीमुळे  अख्या जगाचा  कायापालट होऊ लागला आहे.  एरवी समूहाने  राहणारा  माणूस  आता  आपापसात अंतर ठेवू लागला आहे.या काळात माणुसकीचा हात देने गरजेचे असताना कर्नाटकात माणुसकीची व्याख्या धुळीला मिळवल्याचे समोर आले आहे.  कर्नाटक पोलिसांनी  कामानिमित्त बाहेर असणाऱ्या त्यांच्याच राज्यातील इसमाचा मृतदेह राज्याच्या सीमेवरून आत घेण्यास नकार दिला.  मृतदेहाची दोन दिवस हेळसांड झाली. अखेर तिसऱ्यादिवशी कराडच्या मातीत मृतदेह विसावला.   असिफ लतीफ सय्यद (वय 54) असे त्या अभाग्याचे नाव. कर्नाटक येथील कारावार हे असिफ यांचे मूळ गाव.मात्र ते नोकरी निमित्ताने गुजरात स्थायिक होते. लोकडाऊनच्या  काळात त्यांनी गावी न येता आहे तेथेच राहणे पसंत केले. मात्र तीन दिवसापूर्वी त्यांचे हार्ट अॅटकने गुजरातला  रात्री निधन झाले.  निधनानंतर त्यांचा मृतदेह कागदोपत्री सोपस्कर पूर्ण करुन कर्नाटकला रवाना केला.मृतदेह घेऊन जाणारी गाडी  लाॅक

कराड तालुक्यातील पंधरा जण कोरोना मुक्त

Image
*कराड- युवा निर्धार न्युज नेटवर्क* जिल्ह्यातील आजपर्यंत 60 जण कोरोनामुक्त झाले असून,कराड शहरात फक्त एकजण कोरोना बाधित रुग्ण उरला आहे. यामुळे कराडकरांना दिलासा मिळाला आहे. तर वनवासमाचीची वाटचाल कोरोना मुक्तीकडे होत आहे.कराडच्या सह्याद्री हॉस्पीटल मधून 12 तर कृष्णा मधून 03 अश्या 15 कोरोनामुक्त रुग्णाना डिस्चार्ज मिळाला आहे.15 पैकी 12 जण वनवासमाचीचे रुग्ण झाले कोरोनामुक्त,वनवासमाचीला मोठा दिलासा मिळाला आहे.कोरोनावर यशस्वी मात करत तालुक्यातील 15 जण परतले सुखरूप घरी परतल्यानंतर तालुक्यातील वातावरण दिलासादायक झाले आहे.

बाबरमाची व चरेगाव येथील दोघे झाले कोरोनामुक्त

Image
कृष्णा हॉस्पिटलमधून 2 कोरोनामुक्त पेशंटना टाळ्यांचा गजरात डिस्चार्ज कराड :- युवा निर्धार न्युज नेटवर्क  येथील कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या बाबरमाची आणि चरेगाव येथील दोन्ही कोरोनाग्रस्त रुग्णांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. बाबरमाची येथील 32 वर्षीय युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो 18 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. तर कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात 17 एप्रिल रोजी चरेगाव येथील एका 30 वर्षीय युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याला पुढील उपचारासाठी 25 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. या दोघांवर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्सनी केलेल्या उपचारामुळे आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे हे दोन्हीही रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.  कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्

जिल्ह्यात आणखी 6 कोरोना रुग्ण आढळले. कराड तालुक्यातील 5 रुग्ण ; तर फलटण ला 1

Image
सातारा : (युवा निर्धार)  कराड येथे आज 5 कोरोना बाधित म्हूणन रिपोर्ट आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.पुणे येथून प्रवास करुन आलेल्या 28 वर्षीय युवकाला दि 25 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 42 झाली आहे. यापैकी कराड तालुक्यात 30 जण कोरोना बाधित रुग्ण आहेत.कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातारा जिल्ह्यात वाढत असताना सर्वाधिक रुग्ण हे कराड तालुक्यात आढळून येत आहेत. कराडच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.                          पुणे येथून प्रवास करुन आलेल्या 28 वर्षीय युवकाला दि 25 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल करण्यात आले होते. हा युवक पॉझिटिव्ह (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. या रुग्णावर पुढील उपचार क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथे करण्यात येणार आहे. आतापर्यंत 5 जणांना (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहे. तर 2 जणांच

नव्या अटी व शर्तीवर ग्रामीण क्षेत्रामधील कंपन्या चालू ठेवण्यासाठी परवानगी..

Image
        सातारा दि. 25 (जिमाका) :   साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमालीमधील तरतूदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार शेखर सिंह, अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी सातारा यांनी जिल्हयात अत्यावश्यक सेवा विचारात घेऊन व Directorate of Industries Mumbai. चे परिपत्रक क्र.DI/corona-19/2020/B-6343 Dated 20/04/2020 अन्वये यापूर्वी औद्योगिक तसेच खाजगी क्षेत्रामधील कारखाने कंपन्या, चालू करण्याबाबत यापूर्वी पारित केलेले आदेश वैध राहतील. तसेच  सातारा जिल्हयातील ग्रामीण क्षेत्रामधील सर्व कंपन्या, (ओगलेवाडी ता.कराड परिसर, तसेच नगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रातील वगळून) इत्यादींना चालू ठेवण्यासाठी खालील अटी व शर्तीवर नव्याने परवानगी देणेत येत आहे.  (      महाराष्ट्र शासन, अधिसूचना क्र.DMU/2020 /CR.92/DisM-I, Dated 17 th April 2020 नुसार The relaxation refered in para 15 Clause can be availed by the industrial unit by way of informing Pintimating to the government on the website http://pemission.mideindia.org/ and by submitting a self-

*सोशल मीडियावर बदनामी ; एकावर गुन्हा*

Image
कराड :(युवा निर्धार न्युज नेेेटवर्क) कराड परिसर हा भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले यांच्यामुळेच सील झाला. अशा प्रकारचा  बदनामीकारक मेसेज व्हॉटसअॅपवर व्हायरल करून भोसले यांनी बदनामी करणाऱ्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. बलराज पाटील (पूर्ण नाव नाही) असे संबंधिताचे नाव आहे. त्याने  2024 ला येणारे वादळ या व्हॉटस् ग्रुपवर  मेसेज टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कृष्णा हॉस्पीटलचे सुरक्षा अधिकारी विलास चव्हाण यांनी त्याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांची माहिती अशी की, भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले यांच्या विरोधात बदनामी करणारा आणि त्यांच्यामुळे कराड परिसर सील झाल्याचा मेसेज बलराज पाटील यांनी पोस्ट केला आहे. तो मेसेज त्यांनी 23 एप्रिलला दुपारी पावणे तीनच्या सुमारास 2024 ला येणारे वादळ या ग्रुपवर पाठवला आहे. त्यात डॉ.अतुल भोसले यांची नाहक बदनामी झाली आहे. वास्तविक कोरोनाच्या लढ्यात कृष्णा हॉस्पीटल व त्याचे सर्व कर्मचारी अत्यंत जीगरबाजपणे लढा देत आहेत. सर्व डॉक्टर्स, कर्मचारी जीवाचे रान करून कोरोनोशी दोन हात करत आहेत. अशा स्थितीत कृष्णा हॉस्पिटलचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले, अतुल

कराड येथे 2 अनुमानित रुग्णांना कोरोनाची लागण

Image
(युवा निर्धार न्यूज नेटवर्क) सातारा (जिमाका) दि.19: कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 35 वर्षीय पुरुष आणि उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 30 वर्षीय पुरुष अशा दोघा अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट कोरोना (कोव्हिड 19) पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले असून हे दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.  रुग्णालयात दाखल असलेल्या या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमानुसार निगराणीखाली उपचार सुरु आहेत.

तांबवे येथील युवक झाला कोरोनामुक्त

Image
(युवा निर्धार न्यूज नेटवर्क) सातारा : कोरोना (कोविड 19) बाधीत 35 वर्षीय युवक हा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील विलगीकरण कक्षात दाखल होता. या 35 वर्षीय युवकाचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे, असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. मुंबई वरून प्रवास करून आलेल्या या 35 वर्षीय युवकावर कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज मध्ये कोरोना ( कोविड 19 ) बाधित म्हणून उपचार सुरु होते. त्याची 14 व 15 दिवसा नंतर पुन्हा टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये हा कारोना बाधीत रुग्ण निगेटिव्ह आला आहे. कोरोना बाधीत 35 वर्षी युवक पूर्णपणे बरा झाला असून त्याला आज घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या एकूण 11 होती. यापूर्वी एका महिला रुग्णाचा अहवाल 14 आणि 15 दिवसानंतर निगेटिव्ह आला होता. त्या महिला रुग्ण पूर्णपणे बऱ्या झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे. तसेच 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आता एकूण सात कोरोना बाधित जिल्ह्यात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात चार रुग्ण कोरोना पॉजीटिव्ह

Image
जिल्ह्यात चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह (युवा निर्धार न्युज नेटवर्क) सुरेश डुबल   सातारा - कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 10 महिन्याच्या पुरुष जातीचे बाळ व 28 वर्षीय पुरुष आणि उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 75 वर्षीय महिला तसेच उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 27 वर्षीय महिला अशा 4 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या एकूण 7 होती. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल 14 दिवसानंतर निगेटिव्ह आला असून हा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तसेच 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. 4 कोरोना संसर्गितांवर मार्गदर्शक नियमानुसार  कोटेकोरपणे निगराणीखाली उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण 8 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

क्वाॅरंटाईन केलेल्या 21 परप्रांतियांचे कराडातून पलायन

Image
 कराड : सुरेश डुबल (युवा निर्धार न्यूज नेटवर्क) लॉकडाऊन असल्याने प्रशासनाने कराड तालुक्यातील आटके येथे क्वाॅरंटाईन केलेल्या 21 परप्रांतीयांनी पलायन केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी मंगळवारी पोलिसात नोंद झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पळालेल्या सर्वांवर मंगळवारी सायंकाळी कराड ग्रामिण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पळालेल्या परप्रांतियांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.  ईसेवरमन म, जगल टी, वसंत एस, कृष्णा राजन, दिनेश डी, तमिल वरमन सी, व्यंकटेश के, अजित आर, विजय, मुकेश, सत्य नारायणवाडी, व्यंकटेश, व्यंकटेश, मुरगन, रघुकुमार, प्रदीप, पार्थी, महेश, हरो, लक्ष्मण, व अजित (पुर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी क्वाॅरंटाईन असतानाही पळालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर अनेकजण वाहन मिळत नसल्याने पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावरून चालत आपापल्या गावी निघाले होते. त्यातील काहीजण तामिळनाडूसह इतर राज्यातील हजारो किलोमीटर प्रवास करून चालत जात होते. आशा पायी चालत ज

तळीरामांनी फोडले देशी दारूचे दुकान संत्रा दारूच्या ७०२ बाटल्या चोरल्या

Image
*कराड : सुरेश डुबल(युवा निर्धार न्युज नेटवर्क)* देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी टँगो आणि संत्रा दारूच्या ७०२ बाटल्या मिळून तब्बल २ लाख ६५ हजाराची दारू लंपास केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरा फोडून त्यातील डीव्हीआर मशीन आणि टीव्हीसुध्दा चोरट्यांनी नेला आहे. दुकान मालक सर्जेराव शामराव पाटील (रा. गोवारे, ता. कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांची माहिती अशी की,दुकान मालकाचा पुतण्या हर्षवर्धन याने शनिवारी सकाळी चुलते सर्जेराव पाटील यांना फोन करून दुकानाचे शटर उचकटल्याची माहिती दिली. त्यानंतर ते दुकानाकडे आले आणि कराड शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस आल्यानंतर दुकानात जाऊन पाहिले असता सीसीटीव्ही कॅमेरे फोडून त्यातील डीव्हीआर मशीन तसेच टीव्ही आणि दारूच्या ७०२ बाटल्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. लॉकडाऊनपासून दुकान बंद होते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी दुकान फोडून तब्बल २ लाख ६५ हजाराची दारू लंपास केली आहे. याप्रकरणी अज्ञातांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*कराड येथील 60 वर्षीय पुरुषाला कोरोना*

Image
April 7, 2020 • कराड : (युवा निर्धार न्युज नेटवर्क) कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे दाखल करण्यात आलेल्या 7 अनुमानित रुग्णांपैकी  60 वर्षीय पुरुष  कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर उर्वरित 6 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधीत 9 निकट सहवासितांचे घशातील स्त्रावाचा नमुनेही निगेटिव्ह आले असल्याचे एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे काल 6 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोविड-19 बाधीत रुग्णाच्या चौदा निकट सहवासितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 2 रुग्ण दाखल विलगीकरण कक्षात दाखल केले आहेत. या एकूण 16 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने  एन. आय. व्ही. पुणे  येथे  पाठविण्यात आले आहेत. तसेच काल दुपारी जिल्हा रुग्णालय सातारा  येथे तीव्र जंतु संसर्गामुळे दाखल झालेला 25 वर्षीय अनुमानित अत्यावस्थ झाल्याने रात्री 1 च्या सुमारस त्याला कृष्णा मेडिकल कॉलेज ये

कराडात जुगार अड्यावर छापा

Image
कराड ,दि.6(युवा निर्धार न्युज नेटवर्क)  येथील मार्केट यार्डमधील झोपडपट्टीतील झाडाखाली जुगार खेळणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली केली.यात जुगाराचे साहित्य, वाहने व अन्य साहित्य असा 83 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की , मार्केट यार्डमधील गेट नंबर एकच्या समोरील झोपडपट्टील झाडाखाली आठजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक गुरव यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने संबंधित ठिकाणी छापा टाण्याचे आदेश त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे बसराज भिमशा वालेकर (वय 36, रा. बैलबाजार रोड, कराड), आसिफ इकबाल पटवेकर (40, मुजावर कॉलनी), राजशेखर महादेव तलवार(34), सलीम साहेबराव शेख (31), महिबुब, अलिसाब आत्तार (30), सलीम दस्तगीर छबनुर (29), मस्तान फकरुद्दीन आत्तार (32, सर्व रा. मार्केट यार्ड झोपडपट्टी) व फिरोश रशीद शेख (31, शनिवार पेठ, कराड) हे जुगार खेळताना मिळुन आले. त्यांना ताब्यत घेण्यात आले असुन पोलिस कर्मचारी सागर बर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवर

*कृष्णा बँकेला 11 कोटी 95 लाखांचा ढोबळ नफा* डॉ.अतुल भोसले यांची माहिती ; 554 कोटी रूपयांहून अधिक एकूण व्यवसाय

Image
कराड : (युवा निर्धार न्यूज नेटवर्क) येथील कृष्णा सहकारी बँकेला सन 2019-20 या आर्थिक वर्षात 11 कोटी 95 लाख 32 हजार रूपये एवढा ढोबळ नफा झाला असून, बँकेने 554 कोटी रूपयांहून अधिक एकूण व्यवसाय केला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून लोकांना बचतीची सवय लागावी व गरजेनुसार कर्ज घेता यावे यासाठी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा बँकेच्या 31 मार्च 2020 अखेरच्या एकूण ठेवी 353 कोटी रूपयांच्या असून, 201 कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 554 कोटींच्या वर झाला असून, निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के राखण्यात बँक यशस्वी झाली आहे. सर्व तरतुदी व कर वजा जाता बँकेेने 4 कोटी 28 लाख एवढा निव्वळ नफा कमाविला आहे       देशातील आर्थिक मंदीसदृश्य स्थिती आणि सध्या जगभरात वेगाने फैलावन असलेल्या कोराना साथीच्य

*सातारा जिल्ह्यात ५२ हजार १८४ मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप ; १५ एप्रिल नंतर मोफत तांदुळ होणार उपलब्ध**- जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते*

Image
सातारा दि. 6 ( जि. मा. का ) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून  1 ते 5 एप्रिल अखेर जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 19 शिधापत्रिकाधारकांना तब्बल ५२ हजार १८४ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.  राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 17 लाख 78 हजार 388 आहे.  सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा या लाभार्थ्यांना सातारा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांद्वारे लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेंतर्गत  २ रुपये किलो दराने प्रति कार्ड १५ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रति कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो.त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यां

दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर 3/21/2020*(युवा निर्धार न्युज नेटवर्क)*

Image
News Detail दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर  3/21/2020 *(युवा निर्धार न्युज नेटवर्क)* मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर होता, पण सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झालेली वाढ पाहता, सोमवारी होणारा पेपर आता थेट 31 मार्च नंतर होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसेच 31 मार्चनंतर या पेपरच्या परीक्षेची तारिख जाहीर करण्यात येणार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 मार्च रोजी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसंदर्भात मोठ्या निर्णयाची घोषणा केली होती. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची, तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होतील, अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र दहावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु आता राज्यातील परिस्थिती आणि

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने आठवड्यातून दोन दिवस चालू फक्त सोमवार आणि गुरुवारी रहाणार चालू ठेवण्याचे शासनाचे आदेश

Image
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने  आठवड्यातून दोन दिवस चालू  फक्त सोमवार आणि गुरुवारी रहाणार चालू ठेवण्याचे शासनाचे आदेश   सातारा दि. 20 (जिमाका): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897  दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 च्या पोटकलम 2(अ) नुसार अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सातारा जिल्ह्यातील शहरी भागातील म्हणजेच नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्र  व त्यालगतचे 2 किलोमीटर परिसराच्या क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने म्हणजेच किराणा, भाजीपाला-फळे, बेकरी, दूध, औषध दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने (कपडे, ज्वेलरी, हार्डवअेर अँड पेंटस्, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, शू मार्ट, स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने, बिल्डींग मटेरियल व इतर सर्व प्रकारची दुकाने) आठवड्यातून फक्त सोमवार आणि गुरुवार या दोनच दिवशी चालू राहतील इतर सर्व दिवशी

गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास अटक गावठी कट्ट्यासह जिवंत कडतुस जप्त ;

Image
गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास अटक गावठी कट्ट्यासह जिवंत कडतुस जप्त ;  कराड,दि.5(प्रतिनिधी)  गावटी कट्टा बाळगणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली.कोल्हापुर नाक्याजवळील साई अमृततुल्य टि सेंटर समोर आज गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली.तेजस दिलीप चव्हाण (वय 27) रा.१७६,रविवार पेठ, कराड असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की,एक युवक गावठी कट्टा घेऊन कोल्हापुर नाक्याजवळील साई अमृततुल्य टि सेंटर समोर उभा असल्याची गोपनीय  माहिती पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांना मिळाली.त्या माहितीच्या आधारावर  गुरव यांनी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी  जाऊन  पाहणी केली असता,  एक युवक  संशयास्पदरीत्या  त्या परिसरात फिरताना आढळून आला.त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळु लागला त्यावेळी छापा पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यास पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे कमरेला आतिल बाजुस एक गावटी कट्टा मिळुन आला. तसेच आणखी झाडाझडती घेतल्यावर पॅण्टचे उजवे खिशात एक जिवंत काडतुस मिळुन आले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने

भीमशक्ती संस्थेचे चक्री उपोषण सुरू

Image
भीमशक्ती संस्थेचे चक्री उपोषण सुरू कराड,दि.5(प्रतिनिधी) कराड शहरात काही दिवसापासून पालिकेने अतिक्रमण मोहीम सुरू केली आहे.ही मोहीम राबवताना नगरपालिकेने दुजाभाव दाखवत काही धनदांडग्यांची अतिक्रमणे काढलेली नाहीत. पालिकेला संबंधित प्रकरणाची माहिती देऊनही त्यांनी ती न काढल्याने आज आज गुरुवारपासून भीमशक्ती सामाजिक संस्थेकडून येथील तहसील कार्यालयासमोर चक्री आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले आहे.जो पर्यंत पालिका सरसकट व दुजाभाव न करता अतिक्रमण काढत नाही तोवर हे चक्री उपोषण  सुरू  राहील असा इशारा संघटनेने  दिला आहे.हॉकर्स संघटनेचे जावेद नायकवडी,प्रकाश जाधव,यांचेसह हातगाडेधारकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

दोन चोरीच्या घटनांत दोघांना अटक

Image
दोन चोरीच्या घटनांत दोघांना अटक 3.3.2020 सुरेश डुबल। युवा निर्धार कराड,दि.2(प्रतिनिधी) ओगलेवाडी (ता. कराड) येथे पूर्वी झालेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये पोलिसांनी दोन संशयित चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.शितल गोरख काळे (वय 35, रा. ओगलेवाडी, ता. कराड) व सूर्यकांत शेज्या भोसले (रा. फलटण) अशी चोरट्यांची नावे आहेत. यातील एका चोरट्यांकडून 10 हजार रुपयांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.कराड शहर पोलिसांनी ही कारवाई केली.                       याबाबत पोलिसांनी सांगितले की, ओगलेवाडी येथे नोव्हेंबर 2019 व जानेवारी 2020 या महिन्यांमध्ये दोन चोरीच्या घटना घडल्या होत्या. या चोरी प्रकरणी संबंधितांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावरून पोलिसांचा तपास सुरू होता. तपास करत असताना संशयित चोरट्यांची नावे समोर आल्यानंतर शहर पोलिसांच्या डीबीच्या पथकाने शितल काळे व सूर्यकांत भोसले या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलिसांनी संशयित शितल काळे यांच्याकडून दहा हजार रुपयांचा मोबाईल हस्त

जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी

Image
कराड, दि. 3 (प्रतिनिधी) ः कोरेगाव ता. कराड येथे शेतजमिनीच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव येथे दोन कुटुंबात शेतजमिनीचा वाद आहे. यामधील एका कुटुंबातील सदस्य त्या शेतात सिमेंटचे डांब रोवत होता. त्यावेळी दुसर्‍या कुटुंबातील व्यक्तीने सदरच्या शेतजमिनीत माझी वहिवाट आहे. तुम्ही कोर्टाचा कब्जा घेऊन या मगच पोल रोवा असे सांगितले. यावेळी दोन कुटुंबात बाचाबाची होऊन तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये लाकडी दांडके, लोखंडी गज व दगडाने मारहाण करण्यात आली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
Image
दहावीच्या परीक्षेला आज, मंग‌ळवार ३ मार्चपासून राज्यात सुरुवात  दि.०३/०३/२०२० : - सुरेश डुबल, युवा निर्धार मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज, मंग‌ळवार ३ मार्चपासून राज्यात सुरुवात होणार असून, पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या या परीक्षेत १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी प्रविष्ट होतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी दहावीचा निकाल ७० टक्क्यांपर्यत घसरल्याने यंदापासून पुन्हा अंतर्गत गुण सुरू करण्यात आले असून, ८० गुण लेखी परीक्षेसाठी; तर २० गुण अंतर्गत परीक्षेसाठी असतील.  गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रश्नप्रत्रिकेचे स्वरूप कृतिपत्रिकेप्रमाणे राहणार असून, त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांवर भर देण्यात आला आहे. राज्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा होणार आहे. भाषा विषयाच्या पेपरपासून परीक्षेला सुरुवात होईल. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ९ लाख